पवई पोलिस ठाणे, मुंबई
पवई पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या डिझेल या पेट्रोलियम पदार्थाचा साठा करून विक्री करणाऱ्या तीन आरोपींना अटक, ४५०० लिटर पेट्रोलियम पदार्थ व तीन वाहनांसह एकूण रु. ४१.६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.
दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी अंदाजे ०७.०० वा. सुमारास पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न. भू. क्र. ७/५, मौजे कोपरी, वाहनतळासाठी आरक्षित जागा, हिरानंदानी, पवई, मुंबई येथे "अवैधरित्या डिझेल या पेट्रोलियम पदार्थाचा साठा" करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पवई पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
सदर ठिकाणी आरोपी नामे (१) अफरोज अब्दुल बारी खान, वय ३० वर्षे, (२) मोहम्मद मोईन नसीम खान, वय ४३ वर्षे व (३) सैबाज इलियास खान, वय २१ वर्षे हे कोणताही वैध परवाना अथवा अधिकृत परवानगी नसताना डिझेल या पेट्रोलियम पदार्थाचा साठा करून तो विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी सदर ठिकाणी तपासणी केली असता आरोपींच्या ताब्यातून एकूण ४५०० लिटर डिझेल पेट्रोलियम द्रवपदार्थ, १५ भरलेले लोखंडी ड्रम, १५ रिकामे लोखंडी ड्रम, एक महिंद्रा पिकअप टँकर, एक महिंद्रा पिकअप वाहन, एक टाटा इंट्रा पिकअप वाहन व एक विद्युत पंप असा एकूण अंदाजे रु. ४१,६२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर डिझेल या पेट्रोलियम पदार्थाचा स्रोत, तो कोठून आणण्यात आला तसेच सदर पदार्थ चोरीचा आहे काय, याबाबत आरोपींकडे चौकशी करण्यात येत असून त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी पवई पोलीस ठाणे गु.र.क्र. ११८८/२०२६ अन्वये कलम १२५, २८७, ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम ३, ७, ८ अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ सह कलम ३ व ४ मोटार स्पिरिट (पेट्रोल) आणि हाय स्पीड डिझेल (नियंत्रण) आदेश, २००५ अन्वये गुन्हा दाखल करून ०३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा. श्री. मनोजकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त (का. व सु.), बृहन्मुंबई, मा. श्री. अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. श्री. दत्ता नलावडे, पोलीस उपायुक्त, पश्चिम परिमंडळ-०३, मा. श्री. दादासाहेब घुटकुडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग व
श्री. आत्माजी सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पवई पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब दणाणे, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिठेकर तसेच पोलीस हवालदार झेंडे, सौंदाणे व पोलीस शिपाई शेट्टी, शिंदे, सातपुते व मुलाणी यांनी पार पाडली तसेच तांत्रिक मदत पोह विशाल पिसाळ यांनी केली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पवई पोलीस ठाणे करीत आहेत.
अटक आरोपी :- मोईन नसीम खान वय ४३ वर्षे
१) व्ही. बी. नगर पोलीस ठाणे :- गुरक्र १४४/२०१६ कलम ३७९, २८५, ४११, ४२७, ३४ भादवि सह कलम १५(२) पेट्रोलियम अँड मिनरल ॲक्ट.
२) आर. सी. एफ. पोलीस ठाणे :- गुरक्र ५५५/२०२६ कलम ३, ७, ८ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ सह कलम ३, ४, ७ मोटार स्पिरिट आणि हाय स्पीड डिझेल ऑर्डर १९९८.
३) सी. बी. कंट्रोल :- गुन्हा कलम ३७९, ३४, ४११ भादवि सह ३, ७, ८ अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५.
४) पवई पोलीस ठाणे :- गु.र.क्र. ११८८/२०२६ अन्वये कलम १२५, २८७, ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम ३, ७, ८ अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ सह कलम ३ व ४ मोटार स्पिरिट (पेट्रोल) आणि हाय स्पीड डिझेल (नियंत्रण) आदेश, २००५.
५) विरार पोलीस ठाणे :- गुन्हा रजि क्र ५५४/२०१४ कलम ३७९, ३४ भादवि सह.
६) कुर्ला पोलीस ठाणे :- गुन्हा रजि क्र ८८/२०११ कलम ३७९, ३०४(अ) भादवि.
Most Popular News of this Week
बांगुरनगर पोलिसांनी केला...
बांगुरनगर पोलीस ठाणे कडून एकूण २१,१३,४८,५००/- रुपये किंमतीचा ४२२६.९७ ग्रॅम...
उत्तर परिमंडळ - १, मुंबई...
उत्तर परिमंडळ - १, मुंबई अंतर्गत हस्तगत केलेल्या गहाळ व चोरी झालेल्या...
पवई पोलिस ठाणे, मुंबई
पवई पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या डिझेल या पेट्रोलियम पदार्थाचा साठा करून...
