उत्तर परिमंडळ - १, मुंबई अंतर्गत हस्तगत केलेल्या गहाळ व चोरी झालेल्या मालमत्तेचे वितरण

उत्तर परिमंडळ - १, मुंबई अंतर्गत हस्तगत केलेल्या गहाळ व चोरी झालेल्या मालमत्तेचे वितरण

उत्तर परिमंडळ - १, मुंबई अंतर्गत हस्तगत केलेल्या गहाळ व चोरी झालेल्या मालमत्तेचे वितरण

   उत्तर परिमंडळ-१ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तपासादरम्यान हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळवून देण्याच्या अनुषंगाने मुद्देमाल वितरण सोहळ्याचे आज दिनांक १२/११/२०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते.

   उत्तर परिमंडळ-१ अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

  सदर सोहळ्यामध्ये हस्तगत करण्यात आलेले सोने, चांदी, मोबाईल फोन, वाहने तसेच इतर मौल्यवान मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित तक्रारदार व मालकांना परत करण्यात आले.

सदर कारवाईमध्ये खालील पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.

१. वर्सोवा पोलीस ठाणे :-

दुचाकी व चारचाकी वाहने तसेच मोबाईल फोन असे एकूण ३०,५९,०००/- रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

२. अंबोली पोलीस ठाणे :-

दुचाकी वाहने, मोबाईल फोन व इतर मुद्देमाल असे एकूण ४,२२,४००/- रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

३. ओशिवरा पोलीस ठाणे :-

सोन्याचे दागिने, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने तसेच मोबाईल फोन असे एकूण ४९,८५,०००/- रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहेत.

४. बांगूरनगर पोलीस ठाणे :-

सोन्याचे दागिने व मोबाईल फोन असे एकूण २४,११,५००/- रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

५. गोरेगाव पोलीस ठाणे :-

सोन्याचे दागिने, दुचाकी वाहने, मोबाईल फोन व इतर मुद्देमाल असे एकूण १३,३९,०००/- रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

६. मालाड पोलीस ठाणे :-

सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, दुचाकी वाहने व मोबाईल फोन असे मोठ्या प्रमाणात एकूण १,६७,९२,०००/- रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

   सदर सर्व पोलीस ठाण्यांच्या कारवाईमध्ये एकूण सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, विविध वाहने, मोबाईल फोन व इतर मुद्देमाल असे हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २,९०,०८,९००/- रु. इतकी आहे.

   ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री देवेन भारती, मा. सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री मनोज शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, श्री शशिकुमार मीना,

 मा. पोलीस उप आयुक्त, उत्तर परिमंडळ-१, श्री पुरुषोत्तम कराड, मा. सहा. पोलीस आयुक्त, वर्सोवा विभाग श्री ज्ञानेश्वर आवारी, मा. सहा. पोलीस आयुक्त, गोरेगाव विभाग श्री सुनील जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, ओशिवरा विभाग श्री विनायक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक/वर्सोवा पोलीस ठाणे श्रीमती दिपशिखा वारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक/अंबोली पोलीस ठाणे

  श्री प्रवीण पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक/ओशिवरा पोलीस ठाणे श्री संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक/बांगूरनगर पोलीस ठाणे श्री जयवंत पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक/गोरेगाव पोलीस ठाणे श्री सूर्यकांत खरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक/मालाड पोलीस ठाणे श्री विकास लोकरे पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.


Most Popular News of this Week

बांगुरनगर पोलिसांनी केला...

बांगुरनगर पोलीस ठाणे कडून एकूण २१,१३,४८,५००/- रुपये किंमतीचा ४२२६.९७ ग्रॅम...

उत्तर परिमंडळ - १, मुंबई...

उत्तर परिमंडळ - १, मुंबई अंतर्गत हस्तगत केलेल्या गहाळ व चोरी झालेल्या...