बांगुरनगर पोलिसांनी केला 'कोकेन' या अंमली पदार्थाचा केला पर्दाफाश....
बांगुरनगर पोलिसांनी केला 'कोकेन' या अंमली पदार्थाचा केला पर्दाफाश....
बांगुरनगर पोलीस ठाणे कडून एकूण २१,१३,४८,५००/- रुपये किंमतीचा ४२२६.९७ ग्रॅम “कोकेन” अंमली पदार्थ जप्त.
दि. ०२/११/२०२६ रोजी रात्रौ २०:०० वा. बांगुरनगर लिंकरोड पोलीस ठाण्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे लिंक रोड, गोरेगाव (प.) येथे गस्त करीत असताना शिवम सह. सोसायटी समोर, दक्षिण वाहिनी लिंक रोड, गोरेगाव (प.), मुंबई येथे रस्त्यालगत एक इसम नामे फुलचंद्र ईश्वरदयाल कश्यप, वय- ३१ वर्षे, धंदा- नाही, सध्या रा. ठी- मढ व्हिलेज मालाड (प.), मुंबई, मूळ रा- उत्तर प्रदेश हा संशयास्पद रित्या हालचाल करताना तेथे उभा असलेला दिसून आला.
त्याचेकडे विचारपूस करून अंगझडती घेतली असता त्याचेकडे ५.९७ ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ अंदाजे किंमत २,९८,५००/- रुपये असा मुद्देमाल मिळून आलेने सदर मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला. सदर आरोपीकडे अधिकचा अंमली पदार्थ असल्याचे संशयावरून त्याचे राहते घराची घरझडती घेतली असता, दिनांक ०३/११/२०२६ रोजी ०३.०२ वा. त्याच्या रा. ठि. मढ व्हिलेज मालाड (प.), मुंबई येथील राहत्या घराच्या घरझडती दरम्यान एकूण ६७२ ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ अंदाजे किंमत ३,३६,००,०००/- रुपये (तीन कोटी, छत्तीस लाख रुपये) राहत्या घरात मिळून आलेने सविस्तर घरझडती पंचनामा करून जप्त करण्यात आला. त्यावरून वर नमूद इसमाविरुद्ध बांगुरनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र. १०३९/२०२६, कलम ८(क), २१(क) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
त्याच्याकडे तपासादरम्यान सदरच्या जप्त अंमली पदार्थाबाबत विचारपूस केली असता, त्याने त्याचा साथीदार मुजाहिद अली, रा. मध्य प्रदेश याचे सोबत मिळून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने आरोपी मुजाहिद अली यास गुन्ह्याच्या तपासात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचे तपासामध्ये आतापर्यंत २१,१३,४८,५००/- रुपये (२१ कोटी १३ लाख ४८ हजार ५०० रुपये) किंमतीचा एकूण ४२२६.९७ ग्रॅम वजनाचा कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
त्यानंतर सदरचे दोन्ही आरोपींकडे जप्त कोकेन हा अंमली पदार्थ कोठून आणला व तो अंमली पदार्थ ते कोणास देणार होते याबाबत तसेच त्यांना याकामी आणखी कोणी मदत केली आहे याबाबत पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. सह पोलीस आयुक्त मुंबई (कायदा व सुव्यवस्था) श्री. मनोजकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई श्री. शशी कुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त, उत्तर परिमंडळ १ मुंबई श्री. पुरुषोत्तम कराड, मा. सहायक पोलीस आयुक्त, ओशिवरा विभाग मुंबई श्री. विनायक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बांगुरनगर पोलीस ठाणे मुंबई जयवंत पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज दळवी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि महेश कोंडूभैरी, सपोनि संदीपान उबाळे, पोउपनि प्रविण पडलवार, पोउपनि श्रीकांत कर्पे, पोहवा/९६१०२१ संकपाळ, पोशि/१४०६५९ खेडकर, पोशि/१४००७१ आवळकर, पोशि/१४०२१७ दळवी, पोशि/१४०७९६ गावित यांनी केली आहे.
- :आवाहन :-
अंमली पदार्थ विक्री, साठवणूक, वाहतूक, सेवन करणे हा अपराध असून यामध्ये सहभागी असलेले इसमांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध असल्यास बांगुरनगर लिंकरोड पोलीस ठाणे येथे द्यावी. माहिती देणारे इसमांची नावे गुप्त ठेवली जातील.
Most Popular News of this Week
बांगुरनगर पोलिसांनी केला...
बांगुरनगर पोलीस ठाणे कडून एकूण २१,१३,४८,५००/- रुपये किंमतीचा ४२२६.९७ ग्रॅम...
उत्तर परिमंडळ - १, मुंबई...
उत्तर परिमंडळ - १, मुंबई अंतर्गत हस्तगत केलेल्या गहाळ व चोरी झालेल्या...
