दिवाळीच्या पुर्व संध्येला पोलीसांनकडुन नागरिकांना अनमोल भेट

दिवाळीच्या पुर्व संध्येला पोलीसांनकडुन नागरिकांना अनमोल भेट

दिवाळीच्या पुर्व संध्येला पोलीसांनकडुन नागरिकांना अनमोल भेट
  १ कोटी ६४ लाख रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत, नागरिकांनी व्यक्त केला पोलीसांप्रती विश्वास व कृतज्ञता
   दिनांक ०३/११/२०२६ रोजी दिवाळीच्या पुर्व संध्येला पुर्व परिमंडळ ०१ अंतर्गत सर्व पोलीस ठाणे येथे दाखल चोरी झालेले व हरवलेले मोबाईल फोन, मोटार सायकली, रिक्षा, सोन्याचे दागिने व इतर विविध गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला तसेच पोलीसांनी शोधुन काढलेला त्यामध्ये ११ सोन्याचे दागीने, ०२ मोटार कार, ३३२ मोबाईल फोन, १५ मोटार सायकल, ०५ गहाळ झालेला मुद्देमाल व ११ इतर मुद्देमाल असा एकुण १ कोटी ६४ लाख रुपयाचा मुद्देमाल पोलीसांमार्फत संबंधित फिर्यादी व मुळ मालकांना परत करण्यात आला. सणासुदीच्या काळात आपल्या हरविलेल्या वस्तु पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेह-यावर आनंद व समाधानाचे भाव उमटले. पोलीसांनी केलेल्या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास, आपुलकी आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली.
    सदर मुद्देमाल परतावा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. श्री. धनंजय कुलकर्णी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मुंबई म्हणुन उपस्थित होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना स्वतःच्या मौल्यवान वस्तुंची काळजी घेण्याचे आवाहन केले. एखादा गुन्हा उघडकिण आणण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किती परिश्रम घ्यावे लागतात, तांत्रिक माहीतीचे विश्लेषण, तपासातील बारकावे आणि सातत्यपुर्ण प्रयत्नांच्या माध्यमातुन पोलीसांना गुन्ह्याचा छडा लावावा लागतो. याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच सध्याच्या काळात वाढत असलेल्या सायबर फसवणुकीबाबत नागरिकांना विशेष सतर्क रहावे. अनोळखी लिंक, फोन कॉल किंवा संदेशावर विश्वास ठेवु नये, असे आवाहन केले. तरुणांनी अंमली पदार्थाच्या सेवनापासुन दुर रहावे. अंमली पदार्थाचे दुष्परिणाम लक्षात घेता, अंमली पदार्थाच्या विरोधातील लढ्यात नागरिक व पोलीस यांनी एकत्रितपणें काम करणे अंत्यत आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले. याशिवाय, मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होवु शकतात, त्यामुळे नागरिकांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा व विशेषतः लहान मुलांच्या हातात मोबाईल फोन देण्याचे टाळावे, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. समीर शेख, पोलीस उप आयुक्त, पुर्व परिमंडळ ०१ यांनी प्रास्ताविक करुन मुद्देमाल परतावा कार्यक्रमाची माहीती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहायक पोलीस आयुक्त श्री. रामराव ढिकले, चेंबुर विभाग यांनी केले.
  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उप निरीक्षक संदिप पाटील व महिला पोलीस उप निरीक्षक श्रीमती रुपाली सानप यांनी केले. नागरिकांच्या चेह-यावरचा आनंद व पोलीसांवरील वाढलेला विश्वास हीच मुद्देमाल परतावा कार्यक्रमाची खरी पावती आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण, गुन्ह्याची उकल आणि कायदा व सुव्यवस्था टिकुन राहण्यासाठी मुंबई पोलीस सदैव कटिबध्द आहेत.
   सदरचा कार्यक्रम मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. सह पोलीस आयुक्त का. व सु. श्री. मनोजकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. धनजंय कुलकर्णी यांच्या सुचनेप्रमाणे प्रमाणे करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त, श्री. प्रमोद कोकाटे, ट्रॉम्बे विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेंबुर, गोवंडी, आरसीएफ, ट्रॉम्बे, मानखुर्द, देवनार व शिवाजीनगर तसेच पुर्व परिमंडळ ०१ अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेतली


Most Popular News of this Week

अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...

  अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी               युनिट गुन्हे शाखा,...

गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे...

दीड किलो चरस जप्त; बाळगणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक   ...

पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ...

  पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...

क्राईम ब्रांच

पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...

दक्षिण सायबर पोलीस ठाणे,...

दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांनी लोकल ट्रेनमध्ये महिलांचे...

धाडसी वाहतूक पोलीस शिपाई :...

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार कार...