नाम.जोशी. पोलिस ठाणे, गुन्हे शाखा यूनिट -३

नाम.जोशी. पोलिस ठाणे, गुन्हे शाखा यूनिट -३

पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे कार्यालय
‎

‎  स्थानिक नगरसेवक / शाखा अध्यक्ष असल्याची बतावणी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेकडून अटक केल्याबाबत.

‎   दिनांक १७/११/२०२६ रोजी १६.४५ ते १७.४५ वाजताचे दरम्यान आरोपीने एका तासाचे अवधीत ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक / शाखा अध्यक्ष असल्याची बतावणी करून फिर्यादी यांना परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगून, बोलण्यात गुंतवून, त्यांच्या अंगावरील सोने व रक्कम बांधून त्यांच्या पिशवीमध्ये ठेवण्याचा बहाणा करून, हातचलाखीने ते काढून घेऊन फसवणूक केल्याबाबत दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

  ‎दरम्यानचे कालावधीमध्ये अशाचप्रकारचे अनेक गुन्हे मुंबई व मुंबई उपनगरात दाखल असून, त्यातील आरोपी मिळून येत नसल्याने ते उघडकीस आले नव्हते. सदरची बाब अत्यंत गंभीर असून, सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अनोळखी इसमाचा शोध घेणेकरीता गु.प्र.शा.गु.अ.वि. कक्ष-३ चे अधिकारी व अंमलदार यांचेमार्फत नियोजनबद्ध तांत्रिक व मानवी तपास कौशल्य वापरून आरोपीस दिनांक २०/११/२०२६ रोजी महालक्ष्मी नगर, नायगाव स्टार सिटी, नायगाव पूर्व, वसई-विरार येथून ताब्यात घेण्यात आले.

  ‎आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्याचेविरुद्ध ६१ गुन्हे नोंद असून मुंबई, मुंबई लोहमार्ग व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ०७ गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
‎
   ताब्यात घेतलेला आरोपी – एक पुरुष इसम, वय ५६ वर्षे, मूळ रा. ठि. भिवंडी यास पुढील तपासकामी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे ताब्यात दिलेले आहे.

    ‎सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्ण कान्त उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-मध्य श्री. सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली
    कक्ष-३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, स.पो.नि. सिद्धेश जोष्टे, पो.उ.नि. स्वप्नील काकळीजी, पो.ह. विनोद परब, पो.ह. रविंद्र देवाडे, पो.ह. वैभव गिरकर, पो.ह. बिपीन कोचरेकर, पो.ह. वासुदेव परब, पो.ह. हितेश म्हात्रे व पो.शि. विकास चव्हाण यांनी पार पाडली आहे.


Most Popular News of this Week

भांडुप पोलीस ठाणे, मुंबई

भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारास MPDA कायद्यान्वये...

नाम.जोशी. पोलिस ठाणे, गुन्हे...

पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे कार्यालय ‎‎ ...