Breaking News

रवींद्र चव्हाण यांचा जाहीर सत्कार

रवींद्र चव्हाण यांचा जाहीर सत्कार

 रवींद्र चव्हाण यांचा जाहीर सत्कार

कल्याण : कल्याण पूर्वेत कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान आयोजित कोकण महोत्सव 2025 नवव्या दिवशी  नामदार रवींद्र चव्हाण यांनी कोकण महोत्सवला भेट दिली. या भेटीच्या वेळेस कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या नुकत्याच मिळालेल्या जबाबदारीबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.     

कोकणातील समृद्ध संस्कृतीचवदार पदार्थ आणि रंगीबेरंगी कलांचं भव्य दर्शन कल्याण आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना घडावं या उद्देशाने कल्याण मधील कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 'कोकण महोत्सव २०२५चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन कोकणी संस्कृतीचा आस्वाद घेतला. याप्रसंगी आमदार सुलभा गायकवाडभाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशीकोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Most Popular News of this Week