धाडसी वाहतूक पोलीस शिपाई : प्रशांत गोकुळ हाके
कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार कार घालण्याचा प्रयत्न करून धमकी दिल्याप्रकरणी महिला आरोपी ताब्यात
दिनांक 30/10/2026 रोजी रात्री 20.15 ते 20.30 वा. दरम्यान संगीत महाभारती जंक्शन, प्रतीक्षा बंगल्यासमोर, एन.एस. रोड नं. 10, विलेपार्ले (प.), मुंबई येथे सांताक्रुज वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई प्रशांत गोकुळ हाके हे पोलीस गणवेशात वाहतूक नियमनाचे शासकीय कर्तव्य बजावत होते.
त्यावेळी बी.एम.डब्ल्यू. मोटार कार क्र. MH-02-GJ-*** 4 व मारुती वॅगनआर मोटार कार क्र. MH-02-FX-***0 यांच्यामध्ये किरकोळ अपघात होऊन दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस शिपाई प्रशांत हाके यांनी संबंधित वाहनचालकांना वाहने रस्त्याच्या कडेला घेण्याचे निर्देश दिले.
यावेळी बी.एम.डब्ल्यू. मोटार कार चालविणाऱ्या महिला चालकाने सदर निर्देशांचे पालन न करता पोलीस शिपाई यांच्याशी हुज्जत घालून त्यांना खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. तसेच पोलीस शिपाई हे गणवेशात वाहनासमोर उभे असताना त्यांच्या अंगावर मोटार कार घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस शिपाई यांनी वारंवार वाहन थांबविण्याचे सांगूनही महिला चालकाने वाहनाचा वेग वाढवून त्यांच्या दिशेने वाहन चालविले. त्यामुळे पोलीस शिपाई यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी बाजूला व्हावे लागले. त्यानंतर सदर महिला चालकाने वाहन भरधाव व बेदरकारपणे चालवून जे.व्ही.पी.डी. जंक्शनच्या दिशेने घटनास्थळावरून पलायन केले. सदर अपघातात मारुती वॅगनआर मोटार कारचेही नुकसान झाले.
सदर घटनेप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत गोकुळ हाके यांच्या तक्रारीवरून जुहू पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 1896/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 132, 125, 351(2) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184 प्रमाणे महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील महिला आरोपी ची गुन्ह्याच्या तपासकामी अटक प्रक्रिया चालू असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास जुहू पोलीस ठाणे करीत आहे
Most Popular News of this Week
गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे...
दीड किलो चरस जप्त; बाळगणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक ...
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ...
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
दक्षिण सायबर पोलीस ठाणे,...
दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांनी लोकल ट्रेनमध्ये महिलांचे...
धाडसी वाहतूक पोलीस शिपाई :...
कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार कार...
