दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा,
दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांनी लोकल ट्रेनमध्ये महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढून त्यानंतर AI द्वारे त्यांचे नग्न / अर्धनग्न प्रतिमांमध्ये रूपांतर करून इंस्टाग्रामवर प्रसारित करणाऱ्या आरोपीस बहुस्तरीय तांत्रिक तपासाद्वारे शोधून अटक केल्याबाबत...
दिनांक 22/06/2026 रोजी रात्री सुमारे 20:35 वा. नंतर चर्चगेट ते विरार फास्ट लोकलच्या जनरल प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करीत असलेल्या 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी व तिच्या मैत्रिणींचा एका अनोळखी इसमाने त्यांच्या नकळत व संमतीशिवाय गुपचूपपणे व्हिडिओ चित्रित केला. सदर व्हिडिओ दि. 27/06/2026 रोजी “pile6531” या इंस्टाग्राम आयडीवरून अश्लील गाण्यासह रील स्वरूपात प्रसारित करून तरुणीची विनयभंग व बदनामी करण्यात आली. सदर रील 1,11,000 पेक्षा जास्त वेळा पाहिली गेली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दि. 19/10/2026 रोजी दक्षिण सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्यात आरोपीचे नाव, चेहरा किंवा कोणतीही ओळख उपलब्ध नव्हती. आरोपीने “Playboy” नावाने व एका मुलीचा फोटो लावून बनावट इंस्टाग्राम खाते वापरले होते. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आधारे आरोपी निष्पन्न करून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे त्यांच्या नकळत फोटो व व्हिडिओ काढल्याचे व AI अॅप्लिकेशनच्या सहाय्याने त्या फोटोांचे नग्न / अर्धनग्न प्रतिमांमध्ये रूपांतर (Morphing) करून व्ह्यूज मिळवण्यासाठी ते इंस्टाग्रामवर प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपीकडून जप्त मुद्देमाल :- OPPO कंपनीचा मोबाईल फोन
अटक आरोपीचे नाव :- मोहम्मद साबीर मोहम्मद रुस्तम, वय 31 वर्षे, धंदा – टेलर, रा. वसई (पूर्व), जि. पालघर; मूळ रा. मेरठ, उत्तर प्रदेश.
सदरची प्रशंसनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्णकांत उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त (सायबर गुन्हे) श्री. बजरंग बनसोडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सायरस इराणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली खालील तपास पथक पोलीस निरीक्षक फातिमा बागवान, सहा. पोलीस निरीक्षक ईशान खरोटे, पो.शि.क्र. 130234 नितीन शिंदे, म.पो.शि.क्र. 112670 रेश्मा धुमाळ यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.
नागरिकांना आवाहन :- लोकल ट्रेन, रेल्वे स्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणी महिलांचे गुपचूप फोटो / व्हिडिओ काढताना आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलीस / 112 वर कळवावे. सोशल मीडियावर आपले किंवा इतर कोणाचेही आक्षेपार्ह, बदललेले (Morphed) अथवा AI-निर्मित फोटो / व्हिडिओ आढळल्यास ते पुढे पाठवू नयेत किंवा शेअर करू नयेत; असा मजकूर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणी तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाईनवर अथवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार करावी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पीडितांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येते.
Most Popular News of this Week
गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे...
दीड किलो चरस जप्त; बाळगणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक ...
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ...
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
दक्षिण सायबर पोलीस ठाणे,...
दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांनी लोकल ट्रेनमध्ये महिलांचे...
धाडसी वाहतूक पोलीस शिपाई :...
कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार कार...
