पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे कार्यालय
दिनांक : २८/१०/२०२६ मुंबईतील डोंगरी परिसरातून ‘हायड्रो गांजा’ या अमली पदार्थाची तस्करी करणारे दोन आरोपी जेरबंद.
गुन्ह्याची माहिती :
१. अं.प.वि. कक्ष गु.र.क्र व कलम : १०१/२०२६, कलम ८(क) सह २०(ब), २९ एन.डी.पी.एस. कायदा १९८५
२. अटक दिनांक : २८/१०/२०२६
३. गुन्ह्याचे घटनास्थळ : उमरखाडी क्रॉस लेन, डोंगरी, मुंबई ४००००९
४. आरोपी संख्या : एकूण ०२ आरोपी
५. जप्त अमली पदार्थ व अंदाजे किंमत : एकूण ३ किलो ५६३ ग्रॅम वजनाचा ‘हायड्रो गांजा’ हा अमली पदार्थ. जप्त मुद्देमालाचे एकूण मूल्य (रु. १,२४,७०,५००/-)
गुन्हे शाखेतील अं.प.वि. कक्षाचे आझाद मैदान युनिटचे पथक दिनांक २८/१०/२०२६ रोजी डोंगरी परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाईकरिता गस्त करीत असताना दोन इसम त्यांचे हातातील निळ्या रंगाच्या दोन प्लॅस्टिक पिशवीमधील संशयास्पद वस्तूसह संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आले. सदर इसमांच्या हालचाली या संशयास्पद असून त्यांच्या ताब्यात असलेल्या निळ्या रंगाच्या दोन्ही प्लॅस्टिक पिशवीमध्ये अमली पदार्थ असल्याचा संशय असल्याने त्यांची झडती घेऊन सदर कारवाईमध्ये खालील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हस्तगत मुद्देमाल :-
१) आरोपी क्र. १ याचेकडून एकूण १ किलो ८२३ ग्रॅम वजनाचा ‘हायड्रो गांजा’ हा अमली पदार्थ.
२) आरोपी क्र. २ याचेकडून एकूण १ किलो ७४० ग्रॅम वजनाचा ‘हायड्रो गांजा’ हा अमली पदार्थ.
एकूण ३ किलो ५६३ ग्रॅम वजनाचा ‘हायड्रो गांजा’ हा अमली पदार्थ.
जप्त मुद्देमालाचे एकूण मूल्य (रु. १,२४,७०,५००/-)
नमूद इसमांविरुद्ध अं.प.वि. कक्ष, आझाद मैदान युनिट, गु.र.क्र. १०१/२०२६ कलम ८(क) सह २०(ब), २९ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी ही श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. अनिल कुंभारे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), बृहन्मुंबई, श्री. कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), बृहन्मुंबई, श्रीमती. पौर्णिमा चौगुले-श्रींगी, पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व श्री सुधीर हिरेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई
अंतर्गत आझाद मैदान युनिटचे प्र.पो.नि. श्री. शैलेश सूर्यवंशी यांचे नेतृत्वात पोलीस उप-निरीक्षक, राम लिंगे, पोलीस उप-निरीक्षक सागर घाडगे, पो.ह. पाटील, पो.ह. प्रभु, पो.ह. करांडे, पो.शि भोसले यांनी केली आहे.
------------------००------------------
Most Popular News of this Week
गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे...
दीड किलो चरस जप्त; बाळगणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक ...
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ...
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
दक्षिण सायबर पोलीस ठाणे,...
दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांनी लोकल ट्रेनमध्ये महिलांचे...
धाडसी वाहतूक पोलीस शिपाई :...
कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार कार...
