पायधुनी पोलीस ठाणे, मुंबई.

पायधुनी पोलीस ठाणे, मुंबई.

           पोलीस उप आयुक्त, 

      दक्षिण परिमंडळ - ०२, मुंबई.

      पायधुनी पोलीस ठाणे, मुंबई.

परदेशी बनावटीच्या सिगारेटस् व इलेक्ट्रॉनिक सिगारेटस्‌चा बेकायदेशीररित्या अवैध साठा वितरण व विक्रीकरिता जवळ बाळगणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केलेबाबत.

   दिनांक २८/१०/२०२६ रोजी पायधुनी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त करीत असताना हॉटेल स्टार्स, मस्जिद बंदर पश्चिम, मुंबई ०३ या ठिकाणी छापेमारी करून परदेशी बनावटीच्या सिगारेटस् व इलेक्ट्रॉनिक सिगारेटस्‌चा अवैध साठा वितरण व विक्रीकरिता जवळ बाळगणाऱ्या १९ इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.

  आरोपीतांचा तपशील पुढीलप्रमाणे :

०१) मुजीब हाशिम बकेल अहमद, वय ३१ वर्षे.

०२) मोहम्मद मिरझाब मुनीर कुन्नई, वय २५ वर्षे.

०३) मोहम्मद अनफास हसीनर, वय २० वर्षे.

०४) अश्रफ अब्दुल्ला कोटकुल्लम, वय ४६ वर्षे.

०५) अब्दुल रौफ मोहम्मद, वय ४० वर्षे.

०६) अब्दुल अजमल रोशन, वय ३१ वर्षे.

०७) अब्दुल तमीम मोहम्मद हनीफा, वय २४ वर्षे.

०८) मोईद्दीन नाजी अब्दुल नाजर, वय २५ वर्षे.

०९) रफिक इब्राहीम किझुर, वय ३८ वर्षे.

१०) अबुबकर सोहेल मोहम्मद, वय २६ वर्षे.

११) मोहम्मद शाकीर अब्दुल कादर, वय ३२ वर्षे.

१२) अबु ताहेर इब्राही अर्नथोड मंजिल, वय ३२ वर्षे.

१३) अराफत तोटी हमजा, वय ४१ वर्षे.

१४) सुबेरअली मोहम्मद तोटी, वय ४८ वर्षे.

१५) मोईद्दीन कुन्नी शापी, वय ३० वर्षे.

१६) मोहम्मद रफिक युसेनर उमर, वय ४१ वर्षे.

१७) मोईद्दीन सुबेर, वय ४१ वर्षे.

१८) अब्दुल रहेमान कुनहाली तुपकल, वय ४२ वर्षे.

१९) अब्दुल बाशित के.ओ., वय ३३ वर्षे.

  उपरोक्त नमूद आरोपीतांकडून परदेशी बनावटीच्या ११,७१० नग सिगारेटस् व २,१७२ नग इलेक्ट्रॉनिक सिगारेटस् असा एकूण अंदाजे किंमत रुपये ७२,२१,५५०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

    सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त श्री. मनोजकुमार शर्मा (कायदा व सुव्यवस्था), मा. अपर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे (दक्षिण प्रादेशिक विभाग), पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुधा आर. (दक्षिण परिमंडळ ०२),

  सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती रेणुका बुवा (पायधुनी विभाग), यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कदम, पो.उप.नि. कल्पेश चव्हाण, स. फौ. लाड, पो.ह. ०३०७७२/निकम, पो.ह. ०५०३४८/मुल्ला, पो.ह. ०८१२६९/ठाकूर, पो.शि. ११०७००/पाटील, पो.शि. ०९२८९३/पाडवी, पो.शि. ०९३२३४/आलदर, पो.शि. १३०७५१/शिंदे, पो.शि. १४१०९२/शेख, पो.ह. ०३१५१८/शिंत्रे, पो.शि. ०९३४८०/तुंडीवाले, पो.शि. ०९२८९०/जाधव यांनी केली आहे.


Most Popular News of this Week

अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...

  अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी               युनिट गुन्हे शाखा,...

गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे...

दीड किलो चरस जप्त; बाळगणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक   ...

पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ...

  पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...

क्राईम ब्रांच

पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...

दक्षिण सायबर पोलीस ठाणे,...

दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांनी लोकल ट्रेनमध्ये महिलांचे...

धाडसी वाहतूक पोलीस शिपाई :...

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार कार...