भायखळा गुन्हे शाखेची कारवाई
भायखळा गुन्हे शाखेने फिर्यादी समीर मोहम्मद आसिफ खान वय 41 वर्ष यांचे वर डोक्यार्ड रोड, मीनाक्षी अपार्टमेंट, माझगाव मुंबई, एका अज्ञात इसमाने फिर्यादीवर फायरिंग करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
सदर गुन्ह्याच समांतर तपास गुन्हे शाखेकडून तपास सुरू असताना मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून सदरचा आरोपी क्रमांक ०१ वय वर्ष ३० याने फायरिंग केली. व आरोपी क्रमांक ०२ वय वर्षे ३३ हा त्याचा साथीदार होता. अशी माहिती प्राप्त झाली. तसेच त्यांचे ठिकाण माहीम दर्गा, परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे पोलीस पथक पाठवून आरोपींचा शोध घेता दोन्ही आरोपी मिळून आले.
आरोपीतांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार, व मोटरसायकल, मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.
सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई, श्री. लखमी गौतम मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रोशन मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रकटीकरण (मध्य), श्री. सदानंद राणे यांचे मार्गदर्शनाखाली कक्ष -३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, कक्षा -२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस निरीक्षक शरद धराडे, पोलीस निरीक्षक सुहास माने, स. पो. नि. अमोल माळी, स.पो.नि. रामदास कदम, स.पो.नि. राकेश देशमुख, सहाय्यक फौजदार - अरुण घाटकर, कृतिबास राऊळ दीपक पालांडे, पोलीस हवालदार - सुहास कोंकणकर, गिरीश मोरे, सचिन सरवदे, पंकज भोसले, शिर्के, सुनील हरड, स्वप्निल ढेरे, पोलीस शिपाई - विकास चव्हाण, राहुल पाटील, किरण शेलार, मारुती खेडकर. महिला पोलीस शिपाई- दीपिका ठाकूर पो.ह.चा - अनिकेत मारे, पो.शि.चा - लक्ष्मण दाईगडे यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली.....
Most Popular News of this Week
भायखळा गुन्हे शाखेची कारवाई
भायखळा गुन्हे शाखेने फिर्यादी समीर मोहम्मद आसिफ खान वय 41 वर्ष यांचे वर...
