अमली पदार्थ विरोधी पथक, बांद्रा युनिट
अमली पदार्थ विरोधी कक्ष बांद्रा यांनी एन डी पी एस 1985 कायद्यान्वये गुन्हा दाखल असणारी महिला व अमली पदार्थ तस्करी करणारी सराईत महिला गुन्हेगार नाझिया रबी उल इस्लाम उर्फ शोभा मंडल वय ३३ राहणार ठिकाण. जंगी भारतीय १३, सिंहगड सोसायटी टिळक नगर, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका, मुंबई हिचेवर अमली पदार्थ तस्करी चे एन डी पी एस कायद्यान्वये चार गुन्हे दिसून आले. तसेच नमूद गुन्ह्यात मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून ते न्यायप्रविष्ट होते. जामिनावर सुटून आल्यानंतर महिला आरोपी नाझिया रबी उल इस्लाम उर्फ शोभा मंडल ही पुन्हा अमली पदार्थाची तस्करी करण्यास दिसून आली. त्यामुळे तिचे विरुद्ध माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, यांचे वतीने (PIT NDPS 1988) अन्वये अमली पदार्थ विरोधी कक्ष, बांद्रा युनिट, गुन्हे शाखा यांनी स्थानबद्ध आदेश जारी होण्याकरता मा स्थानबद्ध अधिकारी तथा प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, महाराष्ट्र शासन यास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यानुसार नमूद महिलेस ताब्यात घेऊन तिला १ वर्षासाठी नाशिक रोड, कारागृह येथे दाखल करण्यात आले
नाझिया नबीउल इस्लाम (उर्फ)शोभा मंडल हिच्यावर दाखल असलेले गुन्हे
१) बांद्रा युनिट अ. प. वि. क. मुंबई गु. क्रं. ९७/२०२५, कलम ८(क), सह २२(क), २९ एन. डी. पी. एस. ॲक्ट १९८५
२) कांदिवली युनिट अ. प. वि. क. मुंबई गु. क्रं. ५०/२०२५, कलम ८(क), सह २२, २९ एन. डी. पी. एस. ॲक्ट १९८५
३) बांद्रा युनिट अ. प. वि. क. मुंबई गु. क्रं. २०/२०२४, कलम ८(क), सह २२ (क ), एन. डी. पी. एस. ॲक्ट १९८५
४) डी.बी.मार्ग पो.ठाणे अ. प. वि. क. मुंबई गु. क्रं. २८/२०२३, कलम ८(क), सह २१ (ब), एन. डी. पी. एस. ॲक्ट १९८५
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री देवेन भारती, मा. अनिल कुंभारे ,पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई, माननीय. श्री कृष्णकांत उपाध्याय अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली माननीय श्री नवनाथ ढवळे पोलीस उप आयुक्त अमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा, मुंबई व माननीय श्री सुधीर हिरडेकर सहाय्यक पोलीस आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा मुंबई, अं. प. वि. गुन्हे शाखा,
बांद्रा युनिटचे : प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, यांचे नेतृत्वखाली पोलीस निरीक्षक : विजय गोळे, तसेच गुन्हे प्रतिबंधक शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक : सुवर्णा अडसुळे, पोलीस निरीक्षक सरिता गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सतीश निंबाळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
Most Popular News of this Week
अमली पदार्थ विरोधी पथक,...
अमली पदार्थ विरोधी कक्ष बांद्रा यांनी एन डी पी एस 1985 कायद्यान्वये...
