सायबर गुन्ह्यातील म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश...

सायबर गुन्ह्यातील म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश...

      सायबर गुन्ह्यातील म्युल अकाउंट        रॅकेटचा पर्दाफाश दोन आरोपी अटक, २२ बँक खात्यांचा शोध, देशभरातील ४२ तक्रारींमध्ये सुमारे ₹७.४२ कोटींच्या फसवणुकीचा उलगडा खार पोलीस ठाणे गु.र.क्र. १८३/२०२६ कलम ३१८(४) बीएनएस सह ६६(क), ६६(ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या म्युल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

      फिर्यादी यांना टेलिग्रामद्वारे संपर्क करून ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवून वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये एकूण ₹४,०७,७६४/- जमा करण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यानंतर कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक करण्यात आली.

     तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण व भारत सरकारच्या सायबर हेल्पलाईन १९३० व समन्वय पोर्टलवरील माहितीच्या आधारे आरोपी अविनाश बाबासाहेब खरात व विकास गजानन भुजबळ यांचा सहभाग निष्पन्न झाला. अविनाश खरात याला अटक करण्यात आली.

      चौकशीत आरोपींनी स्वतःच्या व इतर व्यक्तींच्या नावाने विविध बँकांमध्ये खाती उघडून ती सायबर फसवणूक करणाऱ्यांना वापरण्यासाठी दिल्याची बाब उघड झाली. तपासात आरोपी अविनाश खरात यांच्या नावावरील १३ तर आरोपी विकास भुजबळ यांच्या नावावरील ९ अशा एकूण २२ बँक खात्यांची माहिती समोर आली.

      सायबर समन्वय पोर्टलवरील तपासात या २२ खात्यांवर देशभरातील एकूण ४२ तक्रारी आढळून आल्या. या तक्रारींमधील एकूण सायबर फसवणुकीची रक्कम सुमारे ₹७,४२,२८,४०९/- (सात कोटी बेचाळीस लाख अठ्ठावीस हजार चारशे नऊ रुपये) असल्याचे निदर्शनास आले. तसेच आरोपींच्या विविध खात्यांमध्ये फसवणुकीतील मोठ्या प्रमाणात रकमेचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

     सदर गुन्ह्याचा पुढील तपास खार पोलीस ठाण्याकडून सुरू असून या रॅकेटशी संबंधित इतर आरोपी, लाभार्थी व आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करण्यात येत आहे.


खार पोलीस ठाणे सायबर गुन्हा तपास                        पथक


१) वपोनि संतोष काटे 

२) पोनि दिपाली मरळे 

३) पोउपनि  विजय सैद 

४) पोउपनि गोविंद बेडके 

५) पो ह नागेश पाटील 

६) पो शि रुपाली मोटे 

७) पो शि गणेश लोटे


Most Popular News of this Week

सायबर पोलीस ठाणे, वरळी

सायबर गुन्हासाठी वापरले जाणारे बँक खाते (म्युल अकाउंट) खोलणाऱ्या सायबर...

जुहू पोलीस ठाणे- मुंबई

जुहू पोलीस ठाणे हद्दतीत सुरक्षारक्षकाची हत्या करून व्यापारी कुटूंबाची...

सायबर गुन्ह्यातील म्युल...

      सायबर गुन्ह्यातील म्युल अकाउंट        रॅकेटचा पर्दाफाश दोन...