सायबर पोलीस ठाणे, वरळी

सायबर पोलीस ठाणे, वरळी

सायबर गुन्हासाठी वापरले जाणारे बँक खाते (म्युल अकाउंट) खोलणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीस रोख रक्कम व मुद्देमालासह अटक केले बाबत

      सायबर पोलीस ठाणे मध्य विभाग वरळी,  मुंबई यांना २९/०७/२०२६ रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती प्राप्त झाली सलमान पठाण व त्याचे साथीदार हे इंडियन ओव्हरसीज बँक, बोरीवली ब्रांच किंवा माहीम ब्रांच या ठिकाणी म्युल बँक खात्यात सायबर फसवणुकीचे माध्यमातून प्राप्त झालेली रक्कम काढण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली.           त्याअनुषंगाने सायबर पोलीस पथकाने सापळा रचला साधारण १५.०० वा.  सुमारास सलमान पठाण व त्याचे साथीदार इंडियन ओव्हरसीज बँक, बोरवली ब्रांच,  चंदावरकर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई नमूद बँकेतून १०, ००,०००/-  रुपये रोख चेकच्या माध्यमातून काढल्यावर आणखीन १० लाख काढण्याच्या प्रयत्नात असताना सलमान पठाण व त्याच्या दोन साथीदारांस ताब्यात घेतले.

     प्राप्त माहिती नुसार सलमान पठाण याचे स्वतःचे १) के.जी.एन. एंटरप्राइजेस, भाईंदर पश्चिम,  ठाणे व २) रिचा इंटरप्राईजेस, शांती शॉपिंग सेंटर,  मिरा रोड, जिल्हा ठाणे येथे पोलीस पथकाने छापा टाकून आणखीन ०४ साथीदार यांना चौकशी कामी ताब्यात घेऊन एकूण ०७आरोपीतांकडे केलेल्या चौकशीवरून त्यांचा बनावट व्यवहारासाठी वापरले जाणारे बँक खाते व म्युल अकाउंट खोलणाऱ्या व बँकेतून चेकच्या माध्यमातून रक्कम काढणाऱ्या सायबर गुन्ह्यात त्यांचा सहभाग निष्पन्न झाला नमूद गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुद्ध कलम ३१९ (२), ३१८(४), ६१(२), ३(५), भारतीय न्याय संहिता ६६ ड माहिती तंत्रज्ञान कायदा २००० प्रमाणे दाखल करून नमूदगुण्यात त्यांना रितसर अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपीतांची नावे

१) सलमान हबीब पठाण वय ३४ वर्षे २) साजिद निसार अहमद कोठावाला वय ४६ वर्षे ३) चिरा केतन टोपरानी वय ३१ वर्षे ४) सय्यद वजाहत वाहीउद्दीन वय ४१ वर्षे ५) राकेश रमाशंकर मिश्रा ४२ वर्षे ६ महिने ६) रक्षित के राजेंद्र हेगडे वय ३५ वर्षे ७) आर्यन रितेश ठक्कर वय १८ वर्षे

अटक आरोपीतांच्या अंगझडतीत व ऑफिस झडतीमधे खालील वस्तू ताब्यात घेण्यात आल्या

१) एकूण रोख रक्कम १०लाख रुपये

२) एकूण १६ मोबाईल

३) एकूण ३१ वेगवेगळ्या कंपनीचे स्टॅम्प (शिक्के)

४) वेगवेगळ्या मोबाईल कंपनीचे  २३ सिम कार्ड 

५) एकूण २२ वेगवेगळ्या बँके खात्याचे पासबुक

६) एकूण ०७ नग इंडियन ओव्हरसीज बँकेचे वेगवेगळ्या कंपनीच्या नावांचे बँक अकाउंट कि

७) एक कॅश काउंटिंग मशीन

 सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री देवेन भारती सरांच्या नेतृत्वाखाली श्री अनिल कुंभारे - पोलीस सह-आयुक्त, गुन्हे मुंबई, श्रीकृष्णकांत उपाध्याय-अपर पोलीस आयुक्त, गुन्हे मुंबई, श्री बजरंग बनसोडे- सायबर गुन्हे शाखा, मुंबई, श्रीमती सुवर्णा शिंदे- सहाय्यक पोलीस आयुक्त सायबर गुन्हे, मुंबई, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे, मध्य विभाग, वरळी, मुंबई 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक- चिमाजी आढाव, पोलीस निरीक्षक- रविकिरण डोरले, सपोनी- अतुल सानप,  सपोनी - मानसिंग वचकल, सपोनी - कविता कावरे, पो. ह क्रमांक :  ०१३०८ किरण लोखंडे, पो. ह क्रमांक : ०३८७६, अभिजीत गोंजारी,पो. ह क्रमांक :०३३९७ नवनाथ वेताळे, पो. ह क्रमांक : ०४०६९६ विकास तटकरे, पो. ह क्रमांक :०६०६८३ किरण पाटील, पो. ह क्रमांक : ०६०६२१ श्रीकांत पोळ, पो. ह क्रमांक : ०६०७५९ नंदकिशोर महाजन महिला पो. ह क्रमांक :०७१२५० मनीषा मयेकर,

महिला पो. ह क्रमांक : ०८०३०८ शितल सावंत,पोशीः ०९०३४३ कैलास बाबरे यांनी केले आहे.

 

       


Most Popular News of this Week

सायबर पोलीस ठाणे, वरळी

सायबर गुन्हासाठी वापरले जाणारे बँक खाते (म्युल अकाउंट) खोलणाऱ्या सायबर...

जुहू पोलीस ठाणे- मुंबई

जुहू पोलीस ठाणे हद्दतीत सुरक्षारक्षकाची हत्या करून व्यापारी कुटूंबाची...

सायबर गुन्ह्यातील म्युल...

      सायबर गुन्ह्यातील म्युल अकाउंट        रॅकेटचा पर्दाफाश दोन...