जुहू पोलीस ठाणे- मुंबई

जुहू पोलीस ठाणे- मुंबई

जुहू पोलीस ठाणे हद्दतीत सुरक्षारक्षकाची हत्या करून व्यापारी कुटूंबाची हत्येसह लुट करण्याचा कट करणाऱ्या आरोपीतांना अटक

   जुहू पोलीस ठाणे गु.र.क्र. १२३६/२०२६ कलम १०३(१), ३१०(३),२३८ भा.न्या.स. अन्वये दिनांक ०२/०८/२०२६ रोजी रात्रौ ००:४० ते ०४:०० वा च्या दरम्यान एक रहिवासी बिल्डींग मधील व्यावसायिकाला लुटण्याकरिता आलेल्या इसमांनी बिल्डींगचा सुरक्षा रक्षक मनोजकुमार अयोध्या यादव, वय ३८ वर्ष याला मारहान करून, त्याचा कापडी रस्सीने गळा आवळुन जिवे ठार मारून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता सुरक्षा रक्षकाची मृतदेह बिल्डींगच्या पाण्याच्या टाकीमध्ये फेकुन दिल्याची घटना घडली.

    सदरचा गुन्हा घडताच पोलीस उप आयुक्त, पश्चिम परि-२ यांच्या अध्यक्षतेखाली विविध पोलीस पथके तयार करून गुन्हयांचा तपास सुरू करण्यात आला. नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान नमुद गुन्हयामध्ये व्यापारी कुटूंबामध्ये स्वयंपाकी म्हणुन काम करणारा नोकर आणि त्याचा मित्र यांचा सहभाग असल्याची माहिती मिळताच स्वयंपाकी जोगेश्वर उदन मल्लिक उर्फ किशन आणि विजय गोंजारी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये जोगेश्वरी उदन मल्लिका याने प्लॅटची बनावट यावी तयार करून तो ज्या व्यापाऱ्याकडे काम करीत होता तो व्यापारी, त्यांची पत्नी व मुलगी यांची हत्या करून घरातील रोख रक्कम, दागिने लुटण्याचा कट रचल्याचे उघड झाले. सदर कटाची योजना मागिल ०२ वर्षापासुन आखली जात असल्याची माहिती समोर आली.

   आरोपी जोगेश्वर उदन मल्लिक उर्फ किशन या कटाचा मुख्य सुत्रधार असल्याने त्याने सदर योजना पुर्ण करण्याकरिता विजय गोंजारेच्या मदतीने आणखी ०३ साथीदार शरद येरूडकर (४१), त्याचा भाऊ महादेव येरूडकर (३५), अनिकेत बोरनाक (३०) यांना सदर कटामध्ये सामील करून घेतले.

   तपासादरम्यान मुख्य सुत्रधार जोगेश्वर मल्लिक याने त्याच्या साथीदारांची ओळख मयत सुरक्षा रक्षक मनोजकुमार यादव याच्यासोबत करून दिली. ०१ व ०२ ऑगस्ट मधील रात्री आरोपी इमारतीजवळ जमले आणि सुरक्षा रक्षक मनोजकुमार यादव याच्यासह दारू पिण्याकरीता बसले. आरोपीतांना सुरक्षा रक्षकाचा गळा आवळुन, हात बांधुन मृतदेह पाण्याच्या टाकीमध्ये फेकुन दिला. त्यानंतर पहाटे ०४:०० च्या सुमारास आरोपीत ६ व्या मजल्यावर गेले आणि बनावट चावीने प्लॅटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करून व्यापाराच्या घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा उघडण्यामध्ये अपयश आल्यावर त्यांनी प्रयत्न सोडुन तेथुन पळ काढला. आरोपीतांना पकडल्यानंतर गुन्हयांची कबुली दिली आहे.

    गुन्हयांच्या तपासामध्ये अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. अभिनव देशमुख व पोलीस उप आयुक्त, पश्चिम, परिमंडळ २, श्री. मोहित कुमार गर्ग यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विनोद गावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापुराव गावडे, पोलीस निरीक्षक अतुल माळी, संतोष जाधव, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि रणजित चव्हाण, पोउपनि बाळासाहेब पोटे, सपोनि यश पालवे, सपोनि हनमंत कुंभार, पोउपनि सुर्यकांत ओमासे, यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये सहभाग घेतला आहे.


Most Popular News of this Week

सायबर पोलीस ठाणे, वरळी

सायबर गुन्हासाठी वापरले जाणारे बँक खाते (म्युल अकाउंट) खोलणाऱ्या सायबर...

जुहू पोलीस ठाणे- मुंबई

जुहू पोलीस ठाणे हद्दतीत सुरक्षारक्षकाची हत्या करून व्यापारी कुटूंबाची...

सायबर गुन्ह्यातील म्युल...

      सायबर गुन्ह्यातील म्युल अकाउंट        रॅकेटचा पर्दाफाश दोन...