पश्चिम परिमंडळ-२

पश्चिम परिमंडळ-२

   पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त80 मुद्देमाल फिर्यादींना  परत करण्याचा   कार्यक्रम संपन्न

     मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विविध पोलीस ठाण्यांमध्ये तपासादरम्यान हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

     पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत बांद्रा, खार, सांताक्रूझ, जुहू तसेच डी एन नगर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादी/मालकांना परत करण्याची कार्यवाही करण्यात आली. आज रोजी  ८० व्या  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  ८० फिर्यादींना सुमारे ₹१,१५,००,०००/- (एक कोटी पंधरा लाख रुपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला

      यामध्ये सोने, चांदी, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता. दीर्घकाळ तपास व न्यायालयीन प्रक्रियेत असलेला मुद्देमाल संबंधित व्यक्तींना परत मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.

       सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. मोहित कुमार गर्ग,  पोलिस उपायुक्त , पश्चिम परिमंडळ-२, मुंबई यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खार पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.


Most Popular News of this Week

पश्चिम परिमंडळ-२

   पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त80 मुद्देमाल...

खार पोलीस ठाणे, मुंबई

खार पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा गुन्हा उघडकीस; मयताचा पुतण्या आरोपी...

कफ परेड पोलीस, ठाणे

    कफ परेड पोलीस स्टेशन हद्दीतील आर्मी कॅम्पस येथील घरातून १६ तोळे ६...

माता रमाबाई आंबेडकर मार्ग...

मागील 06 वर्षापासून फरार (DF) असलेल्या आरोपीस फेर अटक केले बाबतपोलीस ठाणे:-...