खार पोलीस ठाणे, मुंबई
खार पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा गुन्हा उघडकीस; मयताचा पुतण्या आरोपी निष्पन्न
-- खार पोलीस ठाणे, मुंबई --
खार पोलीस ठाणे हद्दीत रोड क्रमांक ७, खार पश्चिम, मुंबई येथील बांधकाम सुरू असलेल्या AOS Genesis या ठिकाणी एका इसमाचा खून करून त्याचा मृतदेह बांधकाम साहित्याखाली लपवून ठेवल्याची घटना उघडकीस आली होती. सदर प्रकरणाचा तपास कौशल्यपूर्ण व शास्त्रीय पद्धतीने करून खार पोलिसांनी अल्पवयीन आरोपीस निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
-- गुन्ह्याची नोंद --
खार पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 1372/2026, भा.न्या.सं. (BNS) 2023 कलम 103(1), 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा घडण्याचा कालावधी : दि. 17/08/2026 रोजी सकाळी 09:30 वा. ते दुपारी 14:00 वा. दरम्यान.
गुन्हा दाखल : दि. 19/08/2026 रोजी 01:40 वा.
घटनास्थळ : रोड क्रमांक ७, एसबीआय बँकेसमोर, खार पश्चिम, मुंबई येथील AOS Genesis बांधकाम सुरू असलेली साईट.
--- घटनेची थोडक्यात हकीकत ---
दि. 18/08/2026 रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता पश्चिम नियंत्रण कक्ष, मुंबई येथून खार पोलीस ठाण्यास रोड क्रमांक ७, खार पश्चिम येथील AOS Genesis बांधकामाच्या ठिकाणी एक इसम सिमेंटच्या गोण्यांखाली बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली.
सदर माहिती मिळताच खार पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता सदर इसम मृतावस्थेत आढळून आला. त्याची ओळख रविशंकर नंदकिशोर गिरी, वय ३५ वर्षे, व्यवसाय-बांधकाम मजूर, जि. समस्तीपूर, बिहार अशी झाली.
प्राथमिक तपासात सदर इसमाचा अज्ञात व्यक्तीने खून करून मृतदेह बांधकाम साहित्याखाली लपवून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने खार पोलीस ठाणे येथे वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
--- तपासातून आरोपीचा पर्दाफाश ---
तपासादरम्यान घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तेथील technical evidence, घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे तसेच बांधकाम साईटवरील मजुरांकडून मिळालेली माहिती यांचा सखोल अभ्यास करण्यात आला.
तपासादरम्यान मयताचा पुतण्या, वय १७ वर्षे ८ महिने, जि. समस्तीपूर, बिहार हा सुरुवातीस स्वतः तक्रारदाराच्या भूमिकेत राहून पोलिसांची दिशाभूल करण्याचा व घटनेबाबत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तपास पथकाच्या निदर्शनास आले.
मात्र तपास पथकाने त्याच्या बोलण्याची लकब, देहबोली, घटनाक्रमाबाबत दिलेली माहिती, हालचाली तसेच जबाबातील विसंगती यांचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यानंतर त्याच्याकडे शास्त्रीय व तांत्रिक पद्धतीने चौकशी करण्यात आली.
घटनास्थळावरील technical evidence बारकाईने पडताळणी, इतर मजुरांकडून केलेली सखोल चौकशी आणि आरोपीच्या जबाबातील विसंगती यांची सांगड घातल्यानंतर तपास पथकाचा संशय अधिक दृढ झाला. पुढील तपासात मयताचा पुतण्या विशालकुमार रामलखन गिरी हाच सदर गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
--- हत्येचे कारण ---
तपासादरम्यान सदर हत्या अनैतिक संबंधाच्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीस ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदर गुन्हा अत्यंत कमी कालावधीत तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे व सखोल चौकशी यांच्या आधारे उघडकीस आणण्यात खार पोलीस ठाण्याच्या तपास पथकास यश आले आहे.
--- तपास पथक ---
वरिष्ठ पोलीस निरीक्षक : संतोष काटे
पोलीस निरीक्षक राहुल देशमुख – दिवसपाळी पर्यवेक्षक / तपासी अधिकारी
पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे :गुन्हे
--- सहाय्यक पोलीस निरीक्षक ---
1. संदीप पाटील
2. योगेश जाधव
3. हणमंत कुंभारे
--- पोलीस उपनिरीक्षक ---
1. दिनेश पाटील
2. शैलेश चौधरी
3. भाग्यश्री शहाणे
--- पोलीस अंमलदार ---
1. पोह राजकुमार कांबळे
2. पोह कुंदन कदम
3. पोह अजित महाडिक
4. पोह विनोद मदतवाडकर
5. पोशि महेश लहामगे
6. पोशि नामदेव सावंत
7. पोश विशाल भामरे
8. पोशि संतोष कांबळे
9. पोशि अभिजीत कदम
10. पोशि सुमीत अहिवळे
11. पोशि सचिन चव्हाण
12. पोशि माणिक ठोंबरे
Most Popular News of this Week
पश्चिम परिमंडळ-२
पश्चिम परिमंडळ-२ अंतर्गत 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त80 मुद्देमाल...
खार पोलीस ठाणे, मुंबई
खार पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा गुन्हा उघडकीस; मयताचा पुतण्या आरोपी...
कफ परेड पोलीस, ठाणे
कफ परेड पोलीस स्टेशन हद्दीतील आर्मी कॅम्पस येथील घरातून १६ तोळे ६...
माता रमाबाई आंबेडकर मार्ग...
मागील 06 वर्षापासून फरार (DF) असलेल्या आरोपीस फेर अटक केले बाबतपोलीस ठाणे:-...
