बांगलादेशी नागरिकांविरुद्ध खार पोलिसांची कारवाई
खार पोलीस ठाणे, मुंबई
बांगलादेशी नागरिकांविरुद्ध खार पोलिसांची कारवाई; 06 बांगलादेशी नागरिक ताब्यात, बनावट भारतीय ओळखपत्रे तयार करण्याच्या रॅकेटचा तपास सुरू
खार पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक 29/09/2026 रोजी केलेल्या कारवाईमध्ये भारतात अवैधरित्या वास्तव्य करणारे 06 बांगलादेशी नागरिक ताब्यात घेतले. त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रे व ओळखीसंबंधी माहितीची पडताळणी करण्यात आली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.
सदर प्रकरणाच्या तपासामध्ये आरोपीत इकबाल अकबरअली शेख ऊर्फ गौतम सुनिल दत्ता, वय 35 वर्षे याने बांगलादेशातून व्यक्तींना भारतात आणण्यासाठी मदत करणे, त्यांच्यासाठी ओळखपत्रे, रेल्वे प्रवास, राहण्याची जागा व रोजगाराची व्यवस्था करण्यासंदर्भात परस्पर मदत केल्याचे आरोपीने चौकशीदरम्यान निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध खार पोलीस ठाणे गु.र.क्र. 1645/2026, कलम 24, इमीग्रेशन आणि परदेशी कायदा, 2025 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
1)इकबाल अकबरअली शेख ऊर्फ गौतम सुनिल दत्ता, वय 35 वर्षे, 2) राणा मोल्ला इमदादुल मोल्ला ऊर्फ राणा शाह, वय 20 वर्षे, 3) समीम मिझानूर सरदार ऊर्फ राजू नरेंद्र, वय 25 वर्षे, 4) मोसमद मुंजिला खातून ऊर्फ सिला सरदार ऊर्फ रिया दत्ता, वय 23 वर्षे, 5) माफुजा अख्तर लिमा मो. हाशम काझी ऊर्फ कविता शाह, वय 25 वर्षे, 6)हलीमा अख्तर मो. झिल्लू खान ऊर्फ मोनिका दत्ता, वय 26 वर्षे.
अटक आरोपीच्या मोबाईलमध्ये विविध व्यक्तींच्या नावाने असलेले बनावट 40 आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर ओळखपत्रांचे फोटो, महिलांचे फोटो, QR Codes, रेल्वे प्रवासाची तिकिटे तसेच इतर डिजिटल माहिती मिळून आली.
तसेच आरोपीच्या निवासस्थानाची घरझडती घेतली असता तेथून बांगलादेशातील बांग्लालिंक कंपनीचे 01 SIM Card तसेच विविध व्यक्तींच्या नावाने असलेली एकूण 20 संशयित/बनावट आधार कार्डे मिळून आली असून ती पुढील तपासासाठी जप्त करण्यात आली आहेत. सदर आधार कार्डांची सत्यता व ती कोणत्या कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात आली याबाबत संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणी करण्यात येत आहे.
सदर प्रकरणामध्ये बनावट भारतीय ओळखपत्रे तयार करून देणाऱ्या व्यक्ती, बांगलादेशातून भारतात अवैधरीत्या येण्यासाठी मदत करणारे मध्यस्थ/एजंट, प्रवास व निवासाची व्यवस्था करणारे तसेच इतर संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत खार पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.
Most Popular News of this Week
धाडसी पोलिस उप निरीक्षक...
ताडदेव पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक श्री. हृदयनाथ वसंत कदम ...
वरळी पोलिस स्टेशन - मुंबई
वरळी पोलिस स्टेशन गस्ती पथक ह्यांना दिनांक : २८/०९/२६ रोजी. रात्री. १०.४५...
बेकायदेशीर हायड्रो गांजा...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष,गुन्हे शाखा,गु.अ.वि.,...
बांगलादेशी नागरिकांविरुद्ध...
खार पोलीस ठाणे, मुंबई बांगलादेशी नागरिकांविरुद्ध खार पोलिसांची कारवाई; 06...
