गुन्हेगारी
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा ( क्राइम ब्रांच ), मुंबई.
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा ( क्राइम ब्रांच ), मुंबई.
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे कार्यालय
प्रसिद्ध अभिनेत्यावरील गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी १५ तासांत राजस्थानमधून ताब्यात.
दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी अंदाजे १९:०० वाजण्याच्या सुमारास एक प्रसिद्ध सिने अभिनेते जुहू परिसरात आपल्या खाजगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते परतत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या कारच्या दिशेने गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात प्रसिद्ध सिने अभिनेते, त्यांचे चालक आणि एक पादचारी इसम जखमी झाले. सदरबाबत जुहू पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १७९०/२०२६, कलम १०९(१), ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम ३, २५७ शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये गुन्हा दाखल आहे.
गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेची सुमारे २० विशेष पथके तयार करण्यात आली. घटनेनंतर तात्काळ गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींच्या पळून जाण्याच्या मार्गाचा अचूक माग काढला आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानक येथून ताब्यात घेतली. मोटार सायकलच्या मालकाचा शोध घेऊन आरोपींबाबत माहिती प्राप्त करण्यात आली.
तसेच पुढील तांत्रिक तपासाद्वारे आरोपी सुरत येथे गेल्याचा मागोवा काढण्यात आला. त्यानंतर आरोपी सुरत येथून रेल्वेने राजस्थानच्या दिशेने पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली. गुन्हे शाखेकडून आरोपींबाबतची अचूक माहिती राजस्थान पोलिसांना देण्यात आली.
या माहितीच्या आधारे कोटा पोलिसांनी तीनही संशयित आरोपींना कोटा रेल्वे स्थानक, राजस्थान येथे ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
ताब्यात घेण्यात आलेले तीनही आरोपी पुरुष असून ते बिहार व हरियाणा राज्यातील रहिवासी आहेत. अशा प्रकारे मुंबई गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपींना १५ तासांच्या आत ताब्यात घेण्याची कौशल्यपूर्ण कामगिरी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, मुंबई हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्ण कान्त उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-०१) श्री. नवनाथ ढवळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डी (विशेष) श्री. सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.
Most Popular News of this Week
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ...
Nov 02, 2026
पोलीस उप-आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
दक्षिण सायबर पोलीस ठाणे,...
Nov 01, 2026
दक्षिण सायबर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई यांनी लोकल ट्रेनमध्ये महिलांचे...
धाडसी वाहतूक पोलीस शिपाई :...
Nov 01, 2026
कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार कार...
दिवाळीच्या पुर्व संध्येला...
Nov 04, 2026
दिवाळीच्या पुर्व संध्येला पोलीसांनकडुन नागरिकांना अनमोल भेट १ कोटी ६४...
